आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा नूतनीकरणाच्या नावाखाली डाॅक्टरची ५ लाखांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विमा पाॅलिसी नूतनीकरण करायचे अाहे. त्यासाठी हप्ते अाणि जीएसटी रक्कम असे मिळून पावणे पाच लाख रुपये आॅनलाइन भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल अाहे. डाॅ. अब्दुल कदीर बुजुर्गसाहेब पटवेगर (वय ६४, रा. सदर बझार परिसर, विद्यानगर) यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली अाहे. ही घटना जानेवारी ते नऊ एप्रिल २०१८ या कालावधीत घडली अाहे. 


जगमोहन दास, अालोकिया शर्मा, अायकर अधिकारी गुप्ता (तिघांचेही नाव, पत्ते पूर्ण नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. तिघांनी मिळून डाॅ. पटवेगर यांना एके दिवशी फोन केला. अापला विमा पाॅलिसीचा कालावधी पूर्ण होत अाला अाहे. त्याचे उर्वरित हप्ते व जीएसटी असे एकूण ४ लाख ७० हजार ८७८ रुपये जमा करा असे सांगितले. अायडीबीअाय बँक, अहमदाबाद येथील शाखेचा बँक अकाऊंट नंबर दिला. त्यांनी अकाऊंटवर पैसेही भरले. काही दिवसांनी पुन्हा फोन केल्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. फोन नंबरही दोन दिवसात बदलले. गुप्ता याने दोन दिवसांनी वेगळ्या फोन नंबरवरून फोन करून पैसे दोन दिवसात मिळतील असे सांगितले. पण, चौकशी केल्यानंतर हे सगळे बनावट असल्याचे समोर अाले. त्यानंतर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. कुठलीही बँक फोनवरून एटीएम कोड विचारत नाही. अाॅनलाइन पैसे भरण्यास सांगत नाही. कुठलीही विमा पाॅलिसी कंपनी अाॅनलाइन पैसे भरा, तुम्हाला फायदा होणार अाहे, असे सांगत नाही. अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. असे फोन काॅल अाल्यास संबंधित बँक, विमा कंपनी व अन्य कुठेही अार्थिक व्यवहार करताना कार्यालयात चौकशी करावी. 

बातम्या आणखी आहेत...