आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यावर छापा; 22 जणांना केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने मुर्तिजापुरातील बहुचर्चित जुगार अड्ड्यावर शनिवारी छापा टाकला. नगरसेवकपुत्रासह पोलिसांनी २२ जुगारींना अटक केली असून, त्यांच्याकडून २६ लाख ५१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगारावरची सर्वात मोठी कारवाई असल्याने क्लबचालकांचे धाबे दणाणले आहेत.


विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना गोपनीय माहिती मिळाली, की मूर्तिजापुरात राजकीय वरदहस्त असलेला क्लब चालतो. येथे मोठ्या घरासह सामान्य जुगारी येथे येतो. या माहितीवरून त्यांनी शनिवारी रात्री एमआयडीसीतील भावेश राय याच्या जागेत सुरु असलेल्या क्लबच्या आजूबाजूला सापळा रचला. साध्या वेशातील पोलिसांनी क्लबचे मार्ग बंद केले आणि पोलिसी खाक्या दाखवताच येथे बसलेल्या २२ जुगारींना ताब्यात घेतले.


त्यात भूषण गजानन लोहकपुरे रा. भवानी नगर, चेतन अंबादास चौधरी रा. गोयनका नगर, त्रिलोक किसनलाल पंचारिया रा. स्टेशन विभाग , नंदकिशोर आरतमल चावला रा. नानक नगर, स्वप्निल अशोक गुलागे रा. कुंभार पुरा, इब्राहिम कसम न्हानिवाला रा. जुनी वस्ती, मंगेश पुरुषोत्तम पंडितकर रा. टांगा चौक,, अनुप पद्माकर उपाध्ये रा. जुनी वस्ती, श्रीकांत रमेश गावंडे रा. जुनी वस्ती, रमेश भीमराव हिंगड रा. हादगाव, राजू पुरुषोत्तम पंडितकर रा. टांगा चौक, सोमेश्वर दशरथ कोरडे रा. गोयनका नगर, सागर प्रकाश लोहकपुरे रा. भवानी नगर, अशोक नागोराव धामोर रा. कारंजा , जयेश विनोद कोठारी रा. मुरारजी चौक, नाजुकराव काशीराम काकड रा. खडकी, गणेश दिलीप सुरोशे रा. जुनी वस्ती, किशोर देविदास चतुरकार, मोहम्मद शफिद अब्दुल सत्तार रा. कारंजा लाड, खलील रहमान अब्दुल हमीद रा. सिंधी लाईन, सुनील शंकर शिंदे रा. सुरत, सागर दीपक महाजन उर्फ विक्की रा. मुरारजी चौक या जुगारींचा समावेश अाहे. या वेळी त्यांच्याकडून तीन चारचाकी आलिशान कार, सहा मोटर सायकल, वेगवेगळ्या कंपनीचे २१ मोबाइल, असा एकूण २६ लाख ५१हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या टीमने केली.

 

चौघांचा होता क्लब...
विक्की महाजन, भावेश रॉय, भूषण लोहकपुरे, जयेश कोठारी हे चौघे जण एमआयडीसी भागातील भावेश रॉय यांच्या जागेत जुगार क्लब चालवत अाहे,अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली.

 

जुगारीत बड्या हस्ती
या कारवाईत मूर्तिजापूर व कारंजा येथील बड्या व्यावसायिकांसह मूर्तिजापूर येथील एका बँकेच्या अधिकाऱ्याला व नगरसेवक पुत्राला अटक करण्यात आली. राजकीय तसेच इतर दबावाला बळी न पडता पोलिसांनी ही कारवाई केली.

 

बातम्या आणखी आहेत...