आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात पाहूणी आली होती तरूणी, दोघांनी उसाच्या फडात नेऊन केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दक्षिण तालुका, भंडारकवठे शिवारातील उसाच्या फडात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक दुष्कर्म करण्यात आले. याप्रकरणी कदीर मुल्ला यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

 

पीडित मुलगी ही आई सोबत उंब्रज येथे रहात होती. तिच्या बहिणीची प्रसूती झाल्यामुळे ती मदतीकरिता तेलगाव येथे आली होती. २ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ती घरी असताना तिच्या ओळखीचे वालीकर व मुल्ला हे दोघे तेथे आले. तुझी आई घरी चक्कर येऊन पडली आहे. तू आमच्यासोबत चल, असे संागून दुचाकीवरून बसवून घेऊन गेले. रस्त्यात भंडारकवठे शिवारातील एका शेतातील उसाच्या फडात नेऊन तिच्यावर बिरप्पा धर्मराज वालीकर आणि कादीर ख्वाजासाहेब मुल्ला या दोघांनी दुष्कर्म केेले. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद या पीडित मुलीने मंद्रूप पोलिसात दाखल केली होती. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फरार असलेल्या दोघांपैकी मुल्ला यास अटक करून विशेष न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड. क्यातम तर आराेपीकडून अॅड. नागेश खिचडे यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...