आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता रेल्वेचे जनरल तिकीट मराठी भाषेत मिळणार, १ मे महाराष्ट्र दिनापासून उपलब्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आता इंग्रजी आणि हिंदी भाषेनंतर रेल्वेचे सर्वसाधारण (जनरल) तिकीट मराठी भाषेत मिळणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील सर्व स्थानकावर जनरल तिकीट मराठी भाषेत उपलब्ध होतील. तिकिटावर स्थानकाचे नाव, किमी, दर आदींबाबतची सर्व माहिती मराठीत असणार आहे. रेल्वे तिकिटावर प्रसिद्ध होणारी प्रादेशिक भाषेमध्ये मराठी ही तिसरी भाषा असणार आहे. यापूर्वी कन्नड व मल्याळम भाषेतून तिकीट देण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. 


मराठी भाषेला प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला केवळ सर्वसाधारण तिकिटापुरताच हा बदल असणार आहे. नंतर मात्र आरक्षित तिकीटही मराठीतून मिळतील. अनारक्षित तिकीट प्रणालीत सध्या बदल करण्याचे काम 'क्रिस'कडून सुरू आहे. सर्व स्थानकावर अनारक्षित तिकीट मराठीतून दिली जातील, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...