आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजार समितीच्या सत्तेत शेतकरीपुत्रांना संधी द्या' : सहकारमंत्री सुभाष देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आम्ही राजकारणासाठी या निवडणुकीत उतरलो नाही. सत्तेच्या आडून शेतकऱ्यांची घरं मोडणाऱ्या दरोडेखोरांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवावा लागेल. गुन्हे दाखल झाल्यावरही तुमच्यासमोर येऊन मतांचा जोगवा मागतात. मात्र लबाड की खरे याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यायचा आहे. ही निवडणूक आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना बळ देण्यासाठी, हक्कांची जाणीव करून देण्यासाठी लढवत आहोत. माझ्या विरोधात कितीही एकत्र झाले तरी बाजार समितीवर शेतकऱ्यांच्या मुलालाच सभापतिपदी बसवणार, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. 


बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सिद्धरामेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ सावतखेड, मद्रे, सिंदखेड, बंकलगी, बोरूळ, कणबस, शिरवळ, इंगळगी, आचेगाव, आलेगाव आदी गावात जाहीर सभा, बैठका, सभा घेण्यात आल्या. बाजार समिती मिळवण्यासाठी जातीचे राजकरण विरोधक करत आहेत. मात्र मातीचे पूजक म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला ताठ मानेनं सामोरे जात आहोत. शेतकरी परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभा आहे. दबावाच्या राजकारणाला बळी न पडता बाजार समितीत सत्तांतर करून इतिहास घडवा, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले. सभेला सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...