आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकरने पाणीपुरवठ्याची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल द्या; सभागृहात अडीच तास चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- टँकर पाणीपुरवठा घोटाळ्यात कारवाई करण्यात चालढकल करत असलेल्या प्रशासनाला शुक्रवारी महापालिका सभागृहाने चांगलेच धारेवर धरले. सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर चौकशी करून आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश महापौरांनी दिला. विशेष म्हणजे या मुद्द्यावर सुमारे अडीच   तास चर्चा चालली. मात्र, अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 


महापालिकेची मे महिन्यातील सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अजंेड्यावरील सर्व विषयांना मान्यता दिल्यानंतर नगरसेवक नागेश वल्याळ यांनी टँकर पाणीपुरवठ्यातील घोटाळ्याप्रकरणी लक्षवेधी घेतली. टँकर खेपा झाल्यापेक्षा जास्त दाखवून बिले काढल्याचा आरोप करत त्यांनी केला. त्यांचे पुरावे त्यांनी सभागृहात सादर केले. रजिस्टरला नोंद नाही. भवानी पेठ वाॅटर हाऊस येथील रजिस्टर गायब असून, त्याप्रकरणी कारवाई नाही, असेही त्यांनी सांगितले. हा प्रकार गंभीर असून कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी केली. नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी टंेडर देताना शिवगंगा फर्मचे नाव नसताना प्रत्यक्षात आले कसे? हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. 


आठ दिवसांत अहवाल 
झोन क्रमांक दोनची चौकशी करून आठ दिवसांत सभागृहाकडे अहवाल पाठवा. अन्य सात झोनचे अहवालही मनपा सभागृहाकडे पाठवावेत. अधिकारी माहिती देत नसेल तर कारवाई करा. शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्या, असा आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी सभागृहात दिला. 


आमीर खान यांना मानपत्र देणार 
अजंेड्यावरील सर्व विषयास एकमताने मान्यता देण्यात आली. यात सिनेअभिनेता आमीर खान यांना मानपत्र देणे, लेप्रसी काॅलनी येथे घरकुल बांधणे आदी विषयांचा समावेश होता. मनपा प्रभाग क्रमांक ५ येथे २० लाखांची ड्रेनेजलाइन घालण्यासाठी मक्ता मागवला. तो देण्यापूर्वी मक्तेदारांकडून सुरक्षा बयाणा भरून घेतली, ते कसे? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना सभागृह नेते संजय कोळी यांनी मांडली. प्रस्तावामधील सर्व विषयास एकमताने मान्यता देण्यात आली. 


लक्ष्मी-विष्णू चाळ विहिरीचे काय? 
लक्ष्मी -विष्णू चाळ येथील विहिरीतील गाळ काढून मनपाच्या वतीने पंप बसवले. तेथील पाण्यावर मनपाचे नियंत्रण नाही. खासगी गणेश नगर तांड्यातील जागेवर तक्रार आल्यावर तत्काळ मनपा अधिकारी पंप आणतात. पण चाळीतील पंपाकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा नगरसेवक गणेश वानकर यांनी उपस्थित केला. हद्दवाढ भागात पाणीपुरवठा विस्कळीत असून तोे सुरळीत करा अशी मागणी नगरसेवक तौफीक शेख, रियाज खरादी व वहिदा शेख यांनी केली. 


नगरसेवक पाटलांना ट्रेचरवरून आणले 
महापालिकेचे माजी सभागृह नेते नगरसेवक सुरेश पाटील हे गंभीर आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. गैरहजेरीमुळे सदस्यत्व रद्द होणे टाळण्यासाठी शुक्रवारी त्यांना महापालिकेत ट्रेचर व व्हीलचेअरद्वारे आणण्यात आले. त्यांना पुण्याहून विशेष अॅम्ब्युलन्सने राजू पाटील, शशी थोरात यांनी महापालिकेत आणले. सहा महिन्यानंतर आजारी अवस्थेत येत असल्याने त्यांना पाहण्यासाठी महापालिकेत कार्यकर्ते, नागरिकांची गर्दी होती. महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी आदींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नगरसेवक पाटील यांनी रजिस्टवरवर अंगठ्याचा ठसा दिला. त्यानंतर त्यांना परत घराकडे नेण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...