आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा, धनगर, कोळी समाजाचे प्रतिनिधी आले नाहीत; पालकमंत्री देशमुख चर्चेविनाच परतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मराठा, धनगर आणि कोळी समाजाने आपल्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करू न देण्याच्या इशारा दिल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी शुक्रवारी (दि. २०) येथे पाठवले होते. मात्र, संबंधित समाजाचे पदाधिकारी चर्चेसाठी न आल्याने पालकमंत्र्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 


अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची परंपरा आहे. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा व्हायची आहे. मात्र, चार वर्षांत भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने मराठा, धनगर आणि कोळी समाजाच्या संघटनांनी त्यांना विठ्ठलाची महापूजा करू न देण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री पूजेला आल्यास रस्त्यावर उतरून रोखण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्यासाठी वारकरी वेषात मराठा समाजाचे ४० ते ५० हजार युवक येथे दाखल होणार आहेत. त्यासाठी राज्यभरात गुप्त बैठका झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशाच प्रकारे धनगर समाजानेही भूमिका घेतली आहे. 


त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गुरुवारी आमदार भारत भालके यांनीही विधानसभेत याविषयी लक्षवेधी मांडली होती. आपल्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंढरपूरला पाठवल्यास त्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेतूून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ते शुक्रवारी सकाळी येथील विश्रामगृहात आले होते. आमदार भालकेही उपस्थित होते. दोन तासांहून अधिक वेळ पालकमंत्री तिन्ही समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत होते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे पालकमंत्री रिकाम्या हाताने परतले. 


चर्चेसाठी सकारात्मक, मुख्यमंत्री येणार 
दरम्यान, पत्रकारांशी बोलण्याआधी पालकमंत्री देशमुख बाजूच्या एका खोलीत गेले. तेथे त्यांनी भ्रमणध्वनीवरून कोणाशी तरी बराच वेळ संवाद साधला. त्यानंतर ते म्हणाले, आपण चर्चेसाठी सकारात्मक आहोत. मराठा, धनगर, कोळी समाजाच्या मागण्या रास्त आहेत. त्याविषयी दुमत नाही. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखू नये. यात्राकाळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गोरगरीब वारकऱ्यांना नाहक त्रास होईल. मुख्यमंत्री पूजेसाठी जरूर येतील, असे एका प्रश्नावर उसने अवसान आणत ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...