आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढी हे विजयाचे प्रतीक, परंपरेने साजरी करावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -आपले अनेक सण, प्रथा, चालीरीती या कृषी परंपरेबरोबरच ऐतिहासिक व धार्मिक घटनांवरही आधारित अाहेत. गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र नवी पिढी या सणांवर शास्त्रीय कारणांचा शोध घेते, साहजिकच सण साजरा करण्याबाबतच वाद - प्रतिवाद होत आहेत. धार्मिक - ऐतिहासिक घटनांंचा संदर्भ लक्षात घेत सण कशा पद्धतीने साजरे करावेत , ही बाब वैयक्तिक विचारांनुसार बदलत राहील, गुढीपाडव्याच्या परंपरेचा शोध घेतला तर शक राजवटीच्या काळापासून याचे दाखले मिळतात, अशी प्रतिक्रिया इतिहासतज्ज्ञ डॉ. माया पाटील व रवी जाधव यांनी दिली. 


गुढी पाडवा सण हा विविध मतप्रवाहांमुळे वादात सापडला गेला असला तरी आपले आजोबा, पणजोबा, पूर्वापार चालीरितीनुसार साजरा करीत होते, म्हणून करण्याचाही विचार प्रवाह आहे. पण नवी पिढी प्रत्येक सण साजरा करणे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहून तो साजरा करावा की काही बदल करावा यावर विचार व्यक्त करते. त्यामुळे ऐतिहासिक परंपरा, शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेऊन तो साजरा करावा किंवा करू नये याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असे मत दयानंद महाविद्यालय इतिहास विभाग प्रमुख डॉ. रवी जाधव यांनी व्यक्त केले. 

 

डॉ. माया पाटील म्हणाल्या, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन राजांनी शकांचा पराभव केला. शक हे परकीय होते. विजयाची ही ऐतिहासिक घटना गुढी उभारून होते. गुढी उभी करणे ही मराठी परंपरा तेव्हापासून सुरू झाली, याचे कारण सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राजे होते. त्यांनी परकीयांचा पराभव केला. ही आनंदाची घटना म्हणून गुढी उभा करण्याची परंपरा सुरू झाली, असा एक प्रवाह आहे. संत वाङ््मयातही गुढी उभारण्याच्या परंपरांचा उल्लेख आहे. गुढी उभा करण्याच्या या परंपरेचे प्राचीन स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. 

 

समता, बंधूतेची गुढी उभारा... 
गुढी मांगल्याचे, आनंदाचे, विजयाचे प्रतीक आहे. मांगल्य उत्साहासाठी, आनंद वाटण्यासाठी, विजय दाखवण्यासाठी असतो. आज आपल्यात कुठला उत्साह आहे, कुठला आनंद वाटतो आणि कशात विजय झाला आहे. आई-वडील मुलाच्या सुखासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करतात. तीच परंपरा पुढे राहाते. हे फक्त कुटंुबापुरतेच मर्यादित असते. गुढी पाडव्याला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. त्यानेही आपल्या मुलांसाठी सर्व सोयी निर्माण केल्या. हे विश्वचि माझे घर, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. त्यांनी पसायदानात विश्वसुखाची प्रार्थना केली आहे. आपण विश्वघरात सुख, समाधानासाठी काय करतो? ज्यांनी केलं ते केलं, जे करताहेत ते करताहेत, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. उलट आपण त्यांची जमेल तेवढी कुचंबणा करतो. त्यासाठी अमंगल वातावरण तयार करतो. तोच असुरी आनंद वाटतो आणि तोच तकलादू विजय झाल्याचे दाखवतो. अशा वृत्तीचे 'जंतू' इतके व्हायरल झाले आहेत की ते विश्वघर उद्ध्वस्त करायला निघालेत. त्यामुळे विश्वकुटंुबाची सुख, शांती भंग पावली आहे. आपल्याला विश्वकुटंुबात सुख, शांती टिकवायची आहे. त्यासाठी समता, ममता, बंधुतेची गुढी उभी करायची आहे. त्यासाठी माझं ही 'स्वार्थी' भावना सोडून 'आपलं' या नि:स्वार्थी भावनेन राहायला हवं. 

बातम्या आणखी आहेत...