आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांसाठी रेल्वे डब्यात विशेष रॅम्पची सोय;प्रायोगिक तत्वावर पलनाडू एक्सप्रेसमध्ये व्यवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिव्यांग प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर जैव शौचालय बांधल्यानंतर आता त्यांचा प्रवास सुखकर व आरामदायक होण्याकरिता विशेष योजना आखली आहे. फलाट आणि डब्याच्या दरवाजाचे अंतर जास्त असल्याने व्हीलचेअरवर बसून डब्यात प्रवेश करणे अवघड होते. हा प्रवेश सुखकर व्हावा या करिता प्रशासनाने फोल्ड होणारा रॅम्प तयार केला अाहे. याचा वापर करून दिव्यांग प्रवासी थेट डब्यात प्रवेश करू शकतील. तसेच व्हीलचेअरच्या मदतीने ते आपल्या जागेपर्यंत जाऊ शकतील. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच असा निर्णय झाला असल्याचा दावा दक्षिण मध्य रेल्वेने केला.   आंध्र प्रदेशातील गुंटुर ते विकाराबाद दरम्यान धावणाऱ्या पलनाडू एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग प्रवाशांसाठी सोय करण्यात आली असून १८ जानेवारीपासून ही रेल्वेे धावणार आहे. त्यानंतर लवरकच देशभरातील अन्य रेल्वे गाड्यांमध्येही ही साेय उपपलब्ध करून दिली जाणार आहे. 


दिव्यांग प्रवाशांची गरज फोल्डेबल रॅम्प व फोल्डेबल व्हीलचेअर तयार करण्यात अाली. हे रॅम्प सर्व प्रकारच्या कोचेसच्या दरवाजांना जोडता येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ते दिव्यांग प्रवाशांना डब्यातून उतरताना व चढताना मदत करतील. पलनाडू एक्स्प्रेसला ज्या ज्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे त्या सर्व स्थानकावरील स्थानक व्यवस्थापकांकडे रॅम्प व व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. साधारणपणे २५० किलोचे वजन हे रॅम्प पेलू शकतील, अशी माहिती रेल्वे विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

 

सोय करणारा दक्षिण मध्य रेल्वे विभाग पहिलाच झोन  

दिव्यांग प्रवाशांना सामान्य डबे ते वातानुकूलित डब्यात प्रवेश करणे जिकिरीचे जात होते. त्यांना डब्यात चढणे व उतरणे सोयीचे होण्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर पलनाडू एक्स्प्रेस रॅम्प व व्हीलचेअरची सोय केली आहे. अशा प्रकारची सोय करणारा दक्षिण मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतला पहिला झोन ठरला आहे. याला चांगला प्रतिसाद लाभला तर अन्य गाडयांमध्येदेखील ही सोय केली जाईल.  
- जॉन थॉमस, अतिरिक्त सरव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद

बातम्या आणखी आहेत...