आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी विधी सेल अध्यक्षपदी हरिभाऊ पवार; उत्तर विधानसभा अध्यक्षपदी अंकलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधी सेलच्या शहराध्यक्षपदी अॅड. हरिभाऊ पवार यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांना पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते. विधी सेलच्या उपाध्यक्षपदी वीरेंद्र अनपट, सचिवपदी शशिकांत जमादार, सहसचिवपदी नितीन लोंढे, खजिनदारपदी एन. डी. चटके यांची निवड करण्यात आली. सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एम. एच. अंकलगी यांची शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ, अॅड. मोहन कुरापाटी यांची शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तर अॅड. असिफ शेख यांची शहर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड झली. निमंत्रित आणि सन्माननीय सदस्य म्हणून ऍड. व्ही. एन. पाटील,डी. एस. चव्हाण, शिरीष जाधव,एम. एच. अंकलगी, राजन दीक्षित, एस. एस. मचाले आणि ए. वाय. दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे. ६२ वकील मंडळींचा राष्ट्रवादी विधी सेलच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...