आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: शहरात शुक्रवारी दोन तास मुसळधार पाऊस, पुन्हा पाणी साचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शुक्रवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यावर पाणी साचले, आदर्शनगर, म्हाडा काॅलनी, लाभामास्तर चाळ आदी ठिकाणी पाणी साचले होते. ते पाणी काढण्याचे काम महापालिका आपत्कालीन विभागाच्या वतीने शनिवारी दुपारपर्यंत करण्यात आले. रस्त्यावर पाणी साचल्याने तेथे रस्ता खराब होत असून, रस्ता करताना पाण्याचे नियोजन न केल्याचे दिसून आले.

 

मुसळधार पाऊस सुमारे दोन तास सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरा पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. लोभामास्तर चाळ येथे पाणी साचले. त्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाट करून दिली. अश्विनी हाॅस्पिटलजवळ आदर्शनगर येथे पाणी साचले. त्याच परिसरात ओक यांच्या घरात पाणी शिरले. त्यांनी स्वत: काम करून घेतले.


या भागात पाणी साचले
सम्राट चौक, जुना एम्प्लाॅयमेंट चौक, डी मार्टसमोर, होटगी रोड बर्फ कारखाना, महावीर चौक, मुलतानी बेकरीसमोर आदी सखल भागात पाणी साचले होते. पाण्यासाठी वाट नसल्याने रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी होते.

 

पाइपलाइन फुटली
होटगी रस्ता परिसरातील भारत मातानगरजवळ महापालिकेतर्फे ड्रेनेज लाइन घालण्याचे काम सुरू अाहे. ते काम करत असताना मुख्य १८ इंची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. बराच वेळ पाणी वाहत होते. यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...