आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीच्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात ८५ लाख मदत; शेतकऱ्यांना दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात ३९६७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे २६४१ हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून ८५ लाख रुपयांची मदत दिली आहे. ही रक्कम तहसीलदारांना वर्ग केली असून शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. 


जिल्हा प्रशासनाने नुकसानीपोटी २६४१ हेक्टरवरील कापूस पिकाच्या नुकसानीपोटी ३ कोटी १४ लाख ७१ हजार रुपयांची मागणी केली होती. 


जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या सहा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक ऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांचे ४८.१० हेक्टर, मोहोळ तालुक्यातील ३ शेतकऱ्यांचे १.६० हेक्टर, अक्कलकोट तालुक्यातील ८५६ शेतकऱ्यांचे ७२०.३५ हेक्टर, माळशिरस तालुक्यातील ३ शेतकऱ्यांचे २ हेक्टर, माढा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांचे १३५.१० हेक्टर, करमाळा तालुक्यातील २०२३ शेतकऱ्यांचे १२५७.४१ हेक्टर, बार्शी तालुक्यातील ७८७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.


एकूण २६४१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६१९ हेक्टर जिरायत तर २०२१ हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या ८५ लाख रुपयांतून दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित माढा, करमाळा व बार्शी तालुक्यांना निधी प्राप्त झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात येणार आहे. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. 


हेक्टरी बागायतसाठी १३५००, जिरायत ६८०० रुपये 
२०१५-१६ मधील रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी डिसेंबर २०१६ रोजी राज्य शासनाने काढलेल्या नव्या निकषाद्वारे मदत केली. ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे, त्याला मदत दिली नाही. ज्यांना विमा मिळाला आहे, त्याच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मदत दिली आहे. पण बोंडअळी प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची मदत मात्र जुन्या निर्णयानुसार जाहीर केली आहे. यामध्ये जिरायतसाठी हेक्टरी ६८०० रुपये तर बागायतसाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...