आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- 'तू म्हातारी दिसतेस, मला शोभत नाही' असे म्हणत नवऱ्याने बायकोवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवारडी येथील तानाजी धायगुडे असे आरोपी नवऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
आहेरवाडी परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींचे देखील लग्न झाले आहे. तानाजीला दारूचे व्यसन आहे. तो सतत पत्नीला दिसण्यावर मारहाण करत होता. तू म्हातारी दिसते म्हणून त्याने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच दोरीनी गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी बायकोने पोलिसात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.