आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरजवळ पती, पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. नानासाहेब वैजीनाथ रोकडे (४०) आणि सुवर्णा नानासाहेब रोकडे (३२) अशी मृतांची नावे आहेत.  ही घटना बुधवारी उघडकीस अाली.  याप्रकरणी पोलिसांनी तपास  सुरू केला आहे. सुवर्णा व नानासाहेब हे दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता होते.  नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.

 

शितोळे हे अापल्या विहिरीवरील वीज मोटार सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना दोघांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी पोलिस व  मृतांच्या नातेवाइकांना याबाबत माहिती दिली.  रोकडे हे शेतमजूर होते. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, अाई, भाऊ असा परिवार अाहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...