आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिरात विनापरवाना बांधकाम; महापालिकेने केला २५ लाखांचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-श्री सिद्धेश्वर मंदिरात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदिर पंच कमिटीला २५ लाख ३९ हजार रुपयांचा दंड केला आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरात सभामंडपाचे काम करताना मंदिर समितीने २० जून २०१७ रोजी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार महापालिकेने पाहणी करून १८ जुलै २०१७ रोजी नगररचना विभागाकडून अभिप्राय मागवला होता. बांधकाम परवान्यासाठी केलेला अर्ज आणि चुकीच्या पद्धतीने तलावात खोदकाम करून केलेले बांधकाम यात तफावत आढळल्याने महापालिकेने हा दंड केला आहे.

 

परवानगी न घेता बांधकाम करणे व ते ही परवानगीत नमूद जागेपेक्षा जास्त जागेवर करणे त्यामुळे मंदिर समितीला २० लाख ३६ हजार ६०० इतकी दंडाची रक्कम व बांधकाम शुल्क असे मिळून २५ लाख ३९ हजार रुपये भरायचे आहेत. यासंदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

 

शहरात चुकीच्या पद्धतीने असे बांधकाम होत असेल तर त्याची पाहणी व मोजणी करून दंड आकारला जातो. सिटी सर्व्हे क्रमांक ६०६५ या जागेत हे बांधकाम होत असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता, महापालिका 

बातम्या आणखी आहेत...