आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू वाहतुकीतील 70 लाखांचा ऐवज जप्त; टेम्पोसह 7 ट्रक ताब्यात, 5 वाहने निसटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा - तांडोर येथील भीमा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणारी सात वाहने मंगळवेढा पोलिसांनी पकडली असून, ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याप्रकरणी सात वाहनचालक व मालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, चालक कैलास आकळे, दत्तात्रय खांडेकर, संदीप बिले यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १८ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. एका टेम्पोसह सात ट्रक पकडण्यात आले. वाहने पोलिसांनी जप्त करून मंगळवेढा पोलिस ठाण्यात लावली आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे येण्यापूर्वी अन्य पाच वाळूची वाहने पळून गेल्याची परिसरात चर्चा होती. पोलिस असताना ही वाहने कशी पळाली, असा प्रश्न विचारला जात आहे. सदर कारवाईत पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहायक फौजदार एम. बी. जमादार, हरिदास सलगर, शहानूर फकीर, कुंभार आदींनी सहभाग घेतला. अधिक तपास मौलाली जमादार करीत आहेत.

 

वाहनमालक बिगरनंबरची वाहने वाळू वाहतुकीसाठी वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तपासणी करत नसल्यामुळे बिगरनंबरची वाहने वापरण्यात वाढ होत आहे. त्यामुळे आरटीओनी कारवाई करणे आवश्यक आहे. नंबर प्लेटवर ग्रीस लावणे, चुना लावणे, नंबरमध्ये खाडाखोड करणे, चुकीचे नंबर लावणे असे प्रकार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...