आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्याचे शासनाने जाहीर केले. पण, प्रत्यक्षात आदेश मार्केटिंग फेडरेशनला मिळाला नाही. तूर खरेदी करताना योग्य वजन होत नसून, नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणकीच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (दि. २५) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर तूर फेकून निषेध व्यक्त केला. अचानक केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांची दमछाक झाली.
तूर खरेदीस मुदतवाढीची घोषणा शासनाने केली. पण, प्रत्यक्षात त्या संदर्भातील आदेश मार्केटिंग फेडरेशनपर्यंत पोहोचला नाही. तुरीची नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रातर्पे एसएमएस आले. तर, काहीना ते मिळाले नाहीत. जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर १२ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुरीची नोंद केली. पण, प्रत्यक्षात साडेपाच हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आलीय. इतर साडेसहा हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. सलग शासकीय सुट्यांमध्येही तूर खरेदीची प्रक्रिया सुरू राहवी, नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.