आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मास : विठ्ठल देवस्थानला दोन कोटी ३२ लाखांचे उत्पन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- नुकत्याच संपलेल्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दोन कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये उत्पन्न मिळाले. मागील अधिक महिन्याच्या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात मंदिर समितीला २७ लाख रुपये जास्त उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. तसेच यावर्षी भाविकांकडून विठ्ठल चरणी १४५ ग्रॅम ५०० मिली सोने, चार किलो ८०५ ग्रॅम ३०० मिली चांदीही अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. 


ढोले म्हणाले, १६ मे २०१८ ते १३ जून २०१८ या कालावधीत अधिक महिना पार पडला. या महिनाभरात सुमारे सहा लाख ९५ हजार भाविकांनी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श तर नऊ लाख ७५ हजार भाविकांनी मुखदर्शन घेतले. श्री विठ्ठलाच्या पायावर ३४ लाख ७३ हजार ८५१ रुपये जमा झाले. याशिवाय अन्नछत्र देणगीसाठी एक लाख ६९ हजार ७४७ रुपये, पावतीद्वारे ६६ लाख २३ हजार ८७३ रुपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीच्या माध्यमातून ३२ लाख पाच हजार ७४० रुपये, राजगिरा लाडू विक्रीद्वारे तीन लाख ७८ हजार ९०० रुपये, फोटो विक्रीद्वारे ६२ हजार २०० रुपये, भक्तनिवास भाडे १२ लाख २८५ रुपये, नित्यपूजेच्या माध्यमातून चार लाख रुपये, चंदन उटी पूजेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार, हुंड्या पेट्या , परिवार देवता दक्षिणा पेट्या व अन्य स्वरुपातून एकूण दोन कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये उत्पन्न समितीला मिळाले. 


तसेच विठ्ठल चरणी भाविकांकडून १४५ ग्रॅम ५०० मिली सोने, चार किलो ८०५ ग्रॅम ३०० मिली चांदीही अर्पण केली आहे. तीन वर्षापूर्वीच्या अधिक महिन्यात समितीला दोन कोटी तीन लाख ३७ हजार ७५१ रुपये उत्पन्न मिळाले होते, असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी ढोले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...