आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
महास्वामीजी म्हणाले, बाराव्या शतकात संत बसवेश्वरांनी लोककल्याणार्थ समानतेची चळवळ उभारली. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. वचनातून सामाजिक न्याय संकल्पना मांडली. व्यक्तीपूजेचे वाढते स्तोम, मंदिरे-मूर्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रध्देला मूठमाती दिली. देवधर्माच्या नावावर पिचलेल्या अज्ञानी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी क्षुद्र-अतिक्षुद्र समुदायांना एकत्र आणले. आत्मिक चिंतनासाठी इष्टलिंगाचा पर्याय दिला. सनातनी विचारांची होळी केली. बसवेश्वरांचे विचार पटल्यामुळे अनेक जाती-धर्मातून लोक अनुभव मंडपाच्या माध्यमातून एकत्र आले. प्रतिकूल परिस्थातीत एकत्र आणलेला लोकसमूह एकसंध ठेवण्यासाठी आणि विज्ञानवादी विचार भविष्यातही टिकून तो कालानुरूप प्रगल्भ होत जाण्यासाठीच बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली.
लिंगायत धर्मात इतर जाती-धर्माच्या समुहातूनही लोक आले होते. त्यात प्रामुख्याने शैवांचाही समावेश होता. बसवेश्वरांच्या हयातीत आणि त्यांच्यानंतर कालांतराने काही स्वार्थी शैवांना, अज्ञानी लोकांचे शोषण बसवेश्वरांच्या विचार आचरण्याने चालत नाही याचा साक्षात्कार झाला. म्हणून त्यानी 'वीर'शैव लिंगायत अशा शब्दप्रयोगाद्वारे स्वत:ची ओळख निर्माण केली, असे सांगून महास्वामीजींनी लिंगायत आणि वीरशैव लिंगायत मत प्रवाहांवर प्रकाश टाकला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... काय म्हणाले महास्वामीजी?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.