आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुप्त होऊ पाहात असलेला \'तिरंदाज\' आढळला पंढरीत, निसर्ग संवर्धन संघटनेची यमाई तलावाला भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकांत बडवे यांनी रंगीत करकोचा पाणी पिताना टिपलेला क्षण - Divya Marathi
श्रीकांत बडवे यांनी रंगीत करकोचा पाणी पिताना टिपलेला क्षण

खर्डी- देशातील नामांकित  बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे कार्यक्रम आयोजक पदाधिकारी नंदकिशोर दुधे हे देवदर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरला आले होते. यावेळी पंढरीतील निसर्ग संवर्धन संघटनेच्या साथीने यमाई तलावाला भेट दिली.

 

सांगोला-पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या यमाई तलावाला सोमवारी दुपारी 11:45 ते 3 या कालावधीत त्यांनी वेढा मारून पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या व अनेक बाबीवर प्रकाश टाकला यामध्ये विविध पक्ष्याचे भक्ष्य, निवास, प्रजनन,ठेवण,दुर्मिळ पक्षि,त्यांचे संवर्धन ,मानवी धोके आशा अनेक मुद्द्यावर टिपण घेत घेत चर्चा मार्गदर्शन केले.या भेटीमध्ये धोका प्रवण असलेले दोन पक्षी आढळले रंगीत करकोचा आणि जवळ जवळ 1994 नंतर 2015 व 2018 म्हणजे आज दिसलेला 'तिरंदाज' ( Orientle Darter) हा लुप्त होण्याचा मार्गावरील पडी आढळला.

 

तसेच या रंगीत करकोच्याच्या वसाहती आणि नवजात पिलांची घरटी पाहून दुधे थक्क झाले. या भेटी दरम्यान त्यांनी काही सूचनाही पक्षी पर्यावरण प्रेमींना दिल्या. यावेळी निसर्ग संवर्धनचे श्रीकांत बडवे, विनय च. बडवे, अमोल कुलकर्णी, सागर राहीरकर, सचीन सोनकांबळे, हे उपस्थीत होते. 

 

या भेटीदरम्यान चक्रवाक, भिवई बदक, थापट्या, प्लवा बदक, पाणडूबी बदक, चित्रबलाक, पाणकावळा, तिरंदाज, राखीबगळा, लहानबगळा, गायबगळा, वंचक, वारकरी बदक, शेकाट्या, माळटीटवी, लाल गाठीची टिटवी, नदिसुरय, होला, भारव्दाज, खंड्या, चिरक, गप्पीदास, पिवळा धोबी, मुनिया, असे पक्षी व त्यांची संख्या नोंदण्यात आली. 


'मी विठ्ठल दर्शनाला आलो होतो पण येथील रंगीत करकोचा या लुप्त होणाऱ्या प्रजातीची जीवन पद्धती वावर पाहून थक्क झालो. फक्त मुंबईतच राहून पक्षी नोंदी करण्यापेक्षा हा तलाव म्हणजे पंढरीचे वैभव आहे. याकडे सर्वानी विशेष लक्ष द्यावे.'

- नंद किशोर दुधे

 

'अनेक देशी परदेशी पक्षाच्या जातीचे आवडते निवास स्थान असणाऱ्या यमाई तलावातील व जवळचे काटेरी झुडपे काढू नयेत, अशी मागणी पक्षी प्रेमीतून होत आहे तसेच मानवी पदपथ मर्यादित ठेवून पक्षाचे संवर्धन व्हावे.'

- सागर राहिरकर (सदस्य निसर्ग संवर्धन)

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यमाई तलाव परिसरातील फोटो..

बातम्या आणखी आहेत...