आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाष्टा उधार न दिल्याने कुर्डूवाडीत भाजप कार्याध्यक्षाची गुंडगिरी, हॉटेलमध्ये केली तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापूर)- राज्यात तसेच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी हवेत आहेत. कुर्डूवाडीत भाजपचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने उमेश पाटील यांना नाष्टा उधार न दिल्याने ही तोडफोड करत शिवीगाळ केल्याचे समजते. हॉटेलमधील चार टेबल व 20 खुर्च्यांचे नुकसान झाले आहे.

 

सूत्रांनुसार, कुर्डूवाडी बायपास रोडवरील डॉ.लोंढे हॉस्पिटल समोरील विजया लक्ष्मी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेल मालक निलेश राजु सावणे यांनी  कुर्डूवाडी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यावरून उमेश पाटील, फयाज दाळवाले, विराज सातारकर, सुहास सरडे,  किरण, बालाजी, राहुल, कारंजकर अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


'तू मला ओळखत नाही का? तुला मस्ती आली का रे..'
उमेश पाटील हॉटेलमध्ये आले. त्यांना उधार नाष्‍टा मागितला. त्यावर निलेश सावणे यांनी म्हणाले, उधार मिळणार नाही रोख पैसे द्यावे लागतील. 'तू मला ओळखत नाही का, तुला मस्ती आली का? असे म्हणत उमेश पाटील यांनी निलेश यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या इतर सहकार्‍यांनी हॉटेलची तोडफोड केली. हा प्रकार 20 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणाचा तपास कुर्डूवाडी पोलिस स्टेशनचे   पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...