आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून आईसह सख्ख्या भावाच्या कुटुंबाला जिवंत जाळले; घटनेत चौघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- शेतजमीन वाटपाच्या कारणावरून तरुणाने मध्यरात्री झोपेत असलेल्या आईसह पोलिस सेवेतील सख्खा भाऊ, भावजय व अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या पुतण्यास रॉकेल ओतून जिवंत जाळले. यात चौघांचाही मृत्यू झाला. आरोपीही जखमी आहे. तालुक्यातील खांडवी येथे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा थरार घडला.

 

मृतांत आई कस्तुरबाई कुरुंददास देवकते (६०), राहुल कुरुंददास देवकते (३०), सुषमा राहुल देवकते (२५), आर्यन राहुल देवकते (सर्व रा. खांडवी, ता. बार्शी) यांचा समावेश आहे. कस्तुरबाई यांनी मृत्युपूर्व जबाबावरून मुलगा रामचंद्र उर्फ तात्या देवकते (३५) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


२८ जून रात्री ९ वाजेच्या सुमारास एका खोलीत राहुल, पत्नी सुषमा, आर्यन व कस्तुरबाई झोपल्या होत्या.  दुसऱ्या खोलीत रामचंद्र, त्याची पत्नी कांताबाई व त्यांची दोन मुले झोपली होते. रात्री एकच्या सुमारास रॉकेल अंगावर पडल्याने कस्तुरबाई जाग्या झाल्या. त्यावेळी त्यांनी उठून पाहिले असता रामचंद्र त्यांच्या अंगावर रॉकेलसारखा वास येत असलेले काही तरी टाकत होता. कस्तुरबाईंना काही समजण्याच्या आतच त्याने काडी ओढून सर्वांना पेटवून दिले. ते सर्वजण जळत असताना आरडाओरडा करत राहुल याने रामचंद्र यास पकडले. त्यामुळे रामचंद्रही भाजला. कस्तुरबाई आरडाओरडा करत पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर आल्या. त्यावेळी आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ व नातेवाईक मदतीला धावले. त्यांनी अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला.


यादरम्यान, सुषमा व आर्यन हे गंभीर भाजल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाला फोन करून पाचारण केले. अग्निशमन दलाच्या मदतीने घरातील आग विझविण्यात आली. संशयित आरोपीही भाजल्याने त्याच्यासह इतर जखमींना उपचारार्थ उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे कस्तुरबाई देवकते यांचा जबाब नोंदविण्यात आला. उपचार सुरू असताना कस्तुरबाई व पोलिस असलेला राहुल यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तुरबाई यांच्या जबाबावरून पोलिसांनी रामचंद्र देवकते विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अंगावर शहारे आणणार्‍या घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...