आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचे अपघाती निधन; भाजप उमदेवाराचा केला होता पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर/बागलकोट- कर्नाटकातील जमखंडी (जि. बागलकोट) चे काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौड (वय ७०) यांचे सोमवारी (दि. २८) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.

 

आमदार न्यामगौड हे गोव्याहून कारने जमखंडीकडे निघाले होते. दरम्यान, तुलसीगेरीजवळ ट्रकला चुकवताना कार पुलाच्या कठड्याला धडकल्याने हा अपघात   झाला. त्यात न्यामगौड यांच्या छातीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. १९९१ मध्ये ते बागलकोटमधून लोकसभेवर निवडून गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...