आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात शोभेच्या दारुकामावेळी स्फोट; 20 गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील मंद्रुप येथे मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी शोभेच्या दारुकामात झालेल्या भीषण स्फोटात 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

दरम्यान, सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याप्रमाणे मंद्रूपमध्ये मळसिद्ध महाराजांची यात्रा होते. सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजता नंदीध्वज जनावरांच्या बाजार मैदानात आल्यानंतर शोभेच्या दारूकामास सुरुवात झाली. प्रारंभी आकाशात विविध रंगी फटाके उडाले. त्यानंतर 15 मिनिटांनी मोठा स्फोट झाला. दारूकाम पाहण्यासाठी गावातील दीड ते दोन हजारांपेक्षा जास्त नागरिक जमले होते. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. फटक्यांचा स्फोट होताच मैदानातील दगड, माती उडून नागरिकांवर पडले. फोडण्यासाठी ठेवलेल्या काही फटक्यांचा स्फोट झाल्याने परिसरात धुळीचे लोट उठले.

 

फटक्यांच्या विस्तवामुळे त्या परिसरातील 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. कस्तुरा सोमनिंग हेळकर (वय ६०), रोहिणी बजरंग मरिआईवाले व राधाबाई बजरंज मरिआईवाले, भागीरथी मल्लिनाथ म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले आहेत.


सहा वर्षांपूर्वी घडली होती दुर्घटना
मंद्रूपच्या यात्रेत सहा वर्षांपूर्वी नंदीध्वज वीजतारेवर पडल्याने शिवानंद म्हेत्रे या युवकाचा शॉक बसल्याने मृत्यू झाला होता. नंदीध्वजास करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईस तारेने बांधले होते. तीच तार नंदीध्वज पेलणाऱ्या शिवानंदच्या हातात होती.


आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ताच नाही
सहा वर्षांपूर्वीच्या मोठ्या दुर्घटनेनंतर यात्रा समन्वयकांनी आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले. दक्षिण तालुक्यातील सीना-भीमा नदीच्या खोऱ्यातील मंद्रूप हे मोठे गाव. येथील यात्रा सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. आपत्ती व्यवस्थापनाकडे यात्रा समन्वयकांनी वेळीच लक्ष दिले असते तर सोमवारची दुर्घटनेची तीव्रता कमी झाली असती. भाविकांच्या सुरक्षिततेऐवजी डिजिटल लावणे, प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच्या खटाटोपावर विशेष लक्ष केंद्रीत असल्याचे चित्र असते.


इतर जखमींची नावे अशी
कृष्णा रेवणसिद्ध कुमठेकर, रेश्मा मल्लिनाथ म्हेत्रे, अश्पाक बागवान, गायत्री दयानंद घाले, राजश्री नागनाथ घाले, विमल श्रीशैल शिंगडगाव, सुंदराबाई इरण्णा नंदुरे, प्रतिभा रामचंद्र गोरे, सुरेखा ओगसिद्ध मायनाळे, भारती गुरुनाथ माळी, अर्चना श्रीमंत मायनाळे, सोनाली इरण्णा नंदुरे, अक्षता काशिनाथ नंदुरे, संगीता इरण्णा नंदुरे, मीनाक्षी मल्लिनाथ कोरे, अनिता रवी मेंडगुदले, महानंदा लोणी व सलमान मकानदार.


मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात डाॅ. हिमांशू बोडरे, परिचारिका अंजली मस्के, राधिका सुतार यांनी उपचार केले. काहीजणांवर डाॅ. विशाल शिळ्ळे यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...