आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानडुक्कर आडवे आल्याने कार उलटून जीपला धडकली, 5 ठार; इज्तेमाहून परतताना अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रानटी जनावराच्या धडकेने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उभ्या जीपवर धडकून झालेल्या अपघातात पाच   ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना सोलापूरपासून आठ किमी अंतरावर मंगळवारी घडली. या विचित्र अपघातात कारमधील  पोलिसासह दोन तर कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सर्वजण अौरंगाबाद येथील राज्यस्तरीय इज्तेमा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत होते.  


महंमद अकलाख पाशा पटेल ( ३२, रा. अरविंदधाम पोलिस वसाहत, सोलापूर), जमीर हुसेन दादासाहेब पटेल (२८,रा. पेनूर, मोहोळ), टिपू सुलतान उमरसाब धप्परबंद (२०), अमीर हमजा लाडलेसाब नंदबाडगी (५०), अब्दुल हुसेन छप्परबंद (४९, रा.  तिघेही बसवबागेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. महंमद पटेल हे सोलापुरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. या भीषण अपघातात सोहेल मदार राजनाल (१८ रा. सलगवस्ती, सोलापूर),  सुलेमान गनीसाब शेख (२५, रा. सिद्धापूर, मंगळवेढा, सोलापूर), सलमान मुसा हजरत पटेल,  इस्माईल नबीसाब वालीकर (२६), दावलसाब दस्तगीरसाब वालीकर (४०), इमामअली मलीकसाब छप्परबंद  ५०),  राजेसाब हुसेनसाब भागेवाडी (४०, बसवनबागेवाडी, विजयपूर) हे अपघातात जखमी झाले.  


असा झाला अपघात 

महंमद पटेल, जमीर पटेल,  सलमान पटेल   हे औरंगाबादवरून कारने येत होते. टिपू सुलतान, अमीर हमजा, अब्दुल यांच्यासह अन्य आठ जण एका जीपमध्ये होते. तुळजापूर- सोलापूर मार्गावरील हगलूर गावाजवळ शीतल ढाबा अाहे. त्या ठिकाणी जीप रस्त्याच्या बाजूला थांबली होती. अाठपैकी चार जण खाली चहा  पिण्यासाठी उतरले होते. याच वेळी  जीपपासून दोनशे मीटर अंतराववरून कार येत होती. या वेळी अचानक शेतातून रस्त्यावर आलेल्या रानटी जनावराने कारला जोरदार धडक दिली. तसेच जनावर कारमध्ये अडकल्यामुळे चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे फरपटत गेल्यानंतर कारचे टायर फुटले. त्यानंतर कार थांबलेल्या जीपवर जाऊन अादळली. यात जीपही उलटली. दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन ती उलटल्याने कारमधील दोन तर जीपमधील तीन जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील आणि ढाब्यावरील नागरिकांनी जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

 

कारचा चुराडा..

सूत्रांनुसार, जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला. जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये तीन जण कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...