आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाश्रमदानात राबले अबालवृद्धांचे हात; दुष्काळ दूर करून गावाला जलयुक्त करण्याचा केला निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- दुष्काळ दूर करून गावाला जलयुक्त कराचंय, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायची असा निर्धार प्रत्येकाने करुन पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानाच्या चळवळीत तालुक्यातील लोंढेवाडी गावाने आघाडी घेतली आहे. गुरुवारी महाश्रमदानात हजारो महिला-पुरुषांनी सहभाग घेतला.

 

'एकजुटीनं पेटलं...रान...तुफान आलं या....'यासह इतर गीतांच्या ध्वनीफित लावून

लोंढेवाडीत अवघ्या दोन तासांत 700 घनमीटर काम झाले. 70 टॅंकर पाणी साठा अर्थात 70 लाख लीटर  पाणी साठवण्यात आले.या महाश्रमदानासाठी गावातील महिला, पुरुषांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवला. गावातील 98 वर्षाचे वयोवृद्ध संदीपान मारुती बोबडे यांनी देखील न थकता श्रमदान केले.सरपंच सारिका लोंढे यानी बुधवारी रात्री मशाल फेरी काढून श्रमदानाबाबत जनजागृती केली होती.

 

विशेष म्हणजे श्रमदानासाठी बबनराव शिंदे शुगर्स अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज (तुर्क पिंपरी/केवड) येथील कारखाण्याच्या जवळपास 400 अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. या कारखाण्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी देखील या महाश्रमदानात सहभाग घेतला.

 

हातात टिकाव, खोरे, पाटी  घेऊन जो तो जबाबदारीने आपापले काम करीत होता. अवघ्या दोन तासांत लोंढेवाडीत झालेल्या महाश्रमदानात आज जवळपास  सातशे घनमीटरचे काम झाले. सुमारे 70 लाख  लीटर पाणी साठेल, असे पाणी फाउंडेशनचे समन्वयक राजकुमार माने यांनी सांगितले.

 

पत्रकारांचेही श्रमदान...
या महाश्रमदानात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवानी देखील श्रमदान केले.

 

श्रमदान केल्यास दाढी कटिंग मोफत
लोंढेवाडी येथील सोमनाथ मच्छिंद्र गाडेकर यांनी महाश्रमदानाच्या ठिकाणी जो कोणी श्रमदान करेल त्यांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात श्रमदान केलेल्या अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील महाश्रमदानाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...