आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाचे आंदोलन तीव्र; आरक्षणासाठी पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. पंढरपूरमधील सांगोला मार्गावर एसटी बसवर दगडफेक करण्‍यात आली आहे. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बसवर झालेल्या दगडफेकीत चार प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

'कोण म्हणतय देत न्याय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', अशा मजूकाराचे पत्रक सकल मराठा समाजाने दगडफेक केलेल्या एसटीबस समोर टाकण्यात आले आहेत. या घटनेची माहीती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

 

..तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापुजेला येऊ देणार नाही!

राज्य सरकारकडून मराठा समाजा आरक्षण देण्यावरून केवळ अश्वासन देत आहे. मात्र, सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आश्वासन देणार असतील तर त्यांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या महापूजेला येऊ देणार नाही, असा पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...