आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाचा निषेध...सोलापूरात दूध उत्पादक शेतकरी दररोज करत आहेत चक्क दुधाने अंघोळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी (ता. मोहोळ)- सोलापूर जिल्ह्यातील पापरीसह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी दुधाने अंघोळ करताना दिसत आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी स्वतःचा दुग्धाभिषेक करून शासनाचा निषेध केला आहे.

 

दरम्यान, चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या दूध बंद आंदोलनाला पापरी परिसरातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रांकडे दूध वाढने बंद केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संकलन केंद्रात एकही लीटर दूध संकलित झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

दूध आंदोलन मागे घेतले जाईल तेव्हा घेतले जाईल, मात्र शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या दूध धारा दररोज त्यांच्या वेळेला सकाळ-संध्याकाळी काढाव्या लागत आहेत. काढलेले दूध संकलन केंद्राकडे तर वाढायचे नाही, खवा, बासुंदी आदी पदार्थही करुन झाले आहेत. 

 

परिसरातील प्रत्येक शेतकर्‍याकडे 10 ते 12 संकरीत गाई आहेत. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो लीटर दूध जमा होते. हे दूध आता घरीच राहत आहे. या दुधाचे करायचे काय?असा प्रश्न शेतकण्‍यांना पडला आहे. त्यामुळे चक्क दुधाने अंघोळ करून शेतकरी शासनाचा निषेध करत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... चक्क दुधाने अंघोळ करणार्‍या शेतकर्‍यांचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...