आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांमागे षड्यंत्र, यांचे केंद्र नागपूर; प्रकाश आंबेडकर यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बहुजनांवरील होत असलेल्या अत्याचारावर एक पॅटर्न काम करीत आहे. दर तीन महिन्यांनी एक घटना घडवून आणून भीती निर्माण करायची आणि ती व्हायरल करायची. अनुवादाच्या विरोधाला शांत करण्याचे हे षड््यंत्र आहे. एकंदरीत क्रूरता पोसली जात अहे. संशयाच्या कारणावरून जीव जाईपर्यंत क्रूरपणे मारणे या सर्व प्रकारातून संशय निर्माण होत आहे. या सर्वप्रकारचे केंद्र नागपूर आहे. यामागे कोण, हा क्रूरपणा येतो कसा, याचा शोध घेणे आवश्यक आहे. असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नागपूरचा उल्लेख करत आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बोट केले आहे. 


आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजनांची आघाडी स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आला. या आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र दौरा केला जात आहे. या दौऱ्याअंतर्गत सोलापुरात आले असता बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्या पाच भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना क्रूरपणे मारहाण करून जीव घेण्यात आला. आज त्यांना जरी शासकीय मदत दिली गेली तरी त्यांचे कुटुंब भयमुक्त जीवन जगत आहेत. अशा घटना अलीकडच्या काही दिवसात घडत आहेत, याचा शोध लागणे खूप महत्त्वाचे आहे. 


भटक्या विमुक्तांना स्थायी जागा हवी 
भटक्या विमुक्त जमातीच्या बांधवांना फक्त आर्थिक मदत देऊन चालणार नाही. तर त्यांना स्थायिक करण्यासाठी शासनाने जागा द्यावी. आज शासनाच्या पाच लाख हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. या जमिनीवर भटक्यांचे पुनर्वसन करावे. सत्तर वर्षांनी तरी मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. आज संविधान अडचणीत आहे. त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. धनगर, माळी, ओबीसी, भटक्या विमुक्त, मुस्लिम आदींनी प्रत्येकी दोन लोकसभेच्या उमेदवारी द्यायला हवे, तरच तडजोड करेन, अन्यथा नाही. लोकशाहीचे सामाजिकीकरण व्हावे असे आमचे प्रयत्न आहे. 

बातम्या आणखी आहेत...