आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! शासकीय वसतिगृहातील 7 विद्यार्थिनींचा विनयभंग; वसतिगृह अधीक्षकाला बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील सात विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या कारणावरून वसतिगृह अधीक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (५३, रा.पंढरपूर) याच्याविरुद्ध पोलिसांनी अॅट्राॅसिटी आणि बाललैंगिक अत्याचारासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यातही घेण्यात अाले अाहे. मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. 

 

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक प्रीती जाधव व अन्य पोलिस कर्मचारी नऊ जुलै रोजी वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधून काही अडचणी आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर काही मुलींनी वसतिगृहाचे अधीक्षक देशपांडे वसतिगृहातील मुलींशी अश्लील वर्तन करतात असल्याची तक्रार केली. त्यानंतर निर्भया पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींना विश्वासात घेतल्यानंतर मुख्य पीडित मुलीने या संदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 

यातील मुख्य पीडित मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे. फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी दुपारी देशपांडे याने इमेल पाठविण्याच्या बहाण्याने आपल्याला कार्यालयात बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तिने अन्य मुलींना रडत सांगितला. त्यानंतर अन्य सहा मुलींना देखील अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...