आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण मराठवाड्यात तापले: सोलापूरात 17 एसटीवर दगडफेक, 1 जाळली; अनेक ठिकाणी हिंसक वळण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ आंदोलकांनी दगडफेक करून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १७ बसची तोडफोड केली, तर एका बसला आग लावली. या घटनांत महामंडळाचे १२ लाखांचे नुकसान झाले. बार्शी-सोलापूर रस्त्यावरील बस बंदोबस्तात आणल्या.

 

अनेक ठिकाणी हिंसक वळण, मराठवाड्यातही उमटले पडसाद
हिंगोली - परळी येथे १८ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चा आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून शनिवारी हिंगाेलीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यभराती आंदोलनाचेे पडसाद उमटत आहेत. आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पाटोदा येथे सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून ५१ जणांनी मुंडण करून निषेध करण्यात आला. बीड तालुक्यातील घाटसावळी येथे बंद पाळण्यात आला असून ढेकणमोहा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वडवणीत आंदोलकांनी निषेध मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. नांदेड जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. अर्धापुरात आरक्षण समर्थकांनी बसवर दगडफेक केली. नांदेड, धर्माबाद, हिमायतनगर येथेही आंदोलन झाले. जालना जिल्ह्यात परतूर येथे सामूहिक मुंडण करण्यात आले.

 

मुख्यमंत्र्यांना महापूजा करू न देण्याचा इशारा
सोलापूर- मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी रात्री शहरातील आंदोलकांची धरपकड करण्यात आली. आंदोलनकर्त्या काही नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

विनायक मेटेंच्या भाषणादरम्यान गोंधळ

परळीत मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षण व मेगा नोकरभरती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक ठिय्या आंदोलन करत आहेत. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे परळीतील आंदोलनस्थळी आले तेंव्हा भाषण सुरू असताना आंदोलकांनी गोंधळ घातला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलकांचा रोष पाहून आमदार विनायक मेटे यांना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी सुरक्षा कडे केले. तेवढ्या पोलिसही आंदोलनस्थळी पोहोचले.पोलिसांनी मेटे यांना त्यांच्या वाहनाच्या ठिकाणापर्यंत नेऊन सोडले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मराठवाड्यात अारक्षण अांदाेलन तापले...

 

बातम्या आणखी आहेत...