आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सोलापूर महापालिकेने प्रस्ताव बहुमताने फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) संस्थापक अध्यक्ष खासदार असोउद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला आहे.  ओवेसी यांचे महाराष्ट्रासह सोलापूरसाठी कुठल्याही प्रकारचे योगदान लाभले नाही. त्यामुळे त्यांना मानपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव आज (शुक्रवार) झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने  फेटाळण्यात आला.

 

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेत एमआयएमचे सदस्य तौफिक शेख, गाजी जहागीरदार, रियाज खैरादी यांनी ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला. मात्र सभागृह नेते संजय कोळी यांनी ओवेसी यांनी महाराष्ट्रासह सोलापूरसाठी कुठल्याही प्रकारचे योगदान दिलेले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना मानपत्र देता येणार नाही, अशी सुचना मांडली़. या सुचनेला अनुमोदन करत शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी ओवेसींना मानपत्र देण्यास कडाडून विरोध दर्शवला. एमआयएमचा इतिहास देशाच्या हिताविरोधी आहे. अशा पक्ष प्रमुखाला मानपत्र देऊ नये, अशी मागणी केली.

 

बातम्या आणखी आहेत...