आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन, आज सोलापूरात अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रसिद्ध कवी, नाट्य लेखक, साहित्यिक आणि तेलगू- मराठी साहित्याचा सेतू म्हणून परिचित असणारे डॉ. लक्ष्मीनारायण इरय्या बोल्ली (वय ७३) यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी सोलापूरच्या पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुले, नातवंडे असा परिवार अाहे. १५ एप्रिल १९४४ रोजी डॉ. बोल्ला यांचा सोलापुरात जन्म झाला. त्यांचे वडील सहकार आणि राजकारणात होते. परंतु डॉ. बोल्ली यांना तेलगू- मराठी साहित्याचा लळा लागला. त्यांनी अनेक कथा, कविता, आत्मचरित्रांचा अनुवाद केला. मैफल, झुंबर, सावली हे त्यांचे काव्यसंग्रह. ‘तेलगू फुलांचा मराठी सुगंध’ या त्यांच्या तौलनिक अभ्यासाला गुरुमहात्म्य पुरस्कार मिळाला. 


‘एका साळियाने’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ‌्मय पुरस्कार मिळाला. ‘कविराय राम जोशी’ या कादंबरीला अत्यंत प्रतिष्ठेच्या दमाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन हैदराबादच्या पोट्टी श्रीरामुलू विश्व विद्यालयाने मानद डी.लिट् दिली हाेती. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात अाला हाेता. शनिवारी सकाळी डाॅ. बाेल्ली यांची घरापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार अाहे. तत्पूर्वी साहित्यासह विविध क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांसाठी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी डाॅ. बाेल्ली यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...