आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कर्मचार्‍यांना मारहाणीचे सत्र सुरुच, माढा तालुक्यात तलाठ्याला महिलेची मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी तालुक्यातील उपळाई (बृ) येथील गावातील जमावाने महावतिरणच्या दोन अधिकारी व कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यातच आज (शुक्रवार) साडे दहा वाजता उपळवटे येथील तलाठी गौरक्षनाथ यशवंत ढाकणे यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

 

तलाठी गौरक्षनाथ ढाकणे हे गावातील तलाठी कार्यालयात काम करीत बसले असताना अलका गायकवाड या कार्यालयात दोघांना घेऊन आल्या. त्यांनी थेट तलाठी ढाकणे यांची शर्टची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

 

अलका गायकवाड यांच्या पतीने दुसर्‍याला 11 गुंठे जमीन विकली होती. ऑनलाइनच्या नोंदी करण्याचे काम सध्या सुरु आहे. ऑनलाइनच्या नोंदी करीत असताना नोटीस बजावली जात नाही.

 

अलका गायकवाड याच्या पतीने विकलेल्या जागेची नोंद 7/12 उतार्यावर ऑनलाइन वर नोंद मंजूर झाली. आम्हाला नोटीस न बजावता नोंद का लावली, याच्या रागातून तलाठी ढाकणे यांना अलका गायकवाड बेदम मारहाण केली आहे.

अलका गायकवाड या प्रहार संघटनेची महिला आघाडीच्या सदस्या आहेत. या प्रकरणी अलका गायकवाड, शुभम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड या तिघा विरोधात टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तिघांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी माढा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष किसन दळवे यानी केली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत तालुक्यातील तलाठ्यांनी शुक्रवारीदुपारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

 

ग्रामीण भागात शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांविषयी रोष
माढा तालुक्यात या आठ दिवसात शासकीय अधिकारी कर्मचार्याना मारहाण केल्याच्या  
घटना घडल्या आहेत. 9 मार्चला भीमा पाठबंधारे चे उपकार्यकारी अभियंता एस.के.चौधरी याना

 

बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
संजय पाटील घाटणेकर पाण्याच्या प्रश्नी मारहाण केली होती. 15 मार्च रोजी उपळाई बृ गावात महावितरणच्या दोन अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली आणि आज ही उपळवटे येथील तलाठ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एकदरीतच माढा तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचार्‍याच्या विषयी रोष व्यक्त होऊ लागला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचा व्हिडिओ...