आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथित पेपरफुटीची समितीकडून तपासणी, अहवाल मंडळाकडे पाठवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैराग, सोलापूर- तांबेवाडीतील (ता. बार्शी) कथित पेपर व्हायरलप्रकरणी शुक्रवारी बोर्डाच्या समितीने कसून तपासणी व चौकशी केली. समितीने आपला अहवाल मंडळाकडे पाठवला आहे. 


तांबेवाडीत बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर मोबाइलवरून व्हायरल झाल्याची चर्चा सुरू आहे. तो पेपर 'सी' कोडचा आहे का? त्या दिवशी तो सोशल मीडियावरून इतरत्र फिरला की ही केवळ अफवा आहे, याची माहिती मंडळाच्या या समितीने घेतली. 


माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने ही त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीत पी. एन. देवज्ञ, आर. डी. जोशी, संजय राठोड व विष्णू कांबळे आदींचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या ज्ञानदीप माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याचे वृत्त झळकल्यानंतर खळबळ उडाली होती. 

बातम्या आणखी आहेत...