आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारीत वारकऱ्यांचा मंदिर समितीकडून विमा; ओरिएंटल इन्शुरन्सकडे भरले ३ लाख ५४ हजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या जीविताची काळजी म्हणून मंदिर समितीने वारकऱ्यांचा विमा उतरविला आहे. १०० वारकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर जखमी वारकऱ्यास एक लाख (मर्यादा : किरकोळ जखमी २५, गंभीर जखमी २५), मृत्युमुखी पडणाऱ्या वारकऱ्यास (मर्यादा ५०) दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तीन दिवसांच्या कालावधीसाठी हे सुरक्षा कवच असेल. मंदिर समितीने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तीन लाख ५४ हजार रुपयांचा प्रीमियम भरला आहे. 


तीन दिवस कालावधी 
२०१५ मध्ये आषाढी यात्रेत चेंगराचंेगरी व चंद्रभागा नदीमध्ये बुडून तीन भाविकांचा मृत्यू झाला हाेता. घटनेचे गांभीर्य पाहून २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा उतरविला होता. पंढरपूर शहर, ६५ एकर, वाखरी पालखी तळ या ठिकाणापर्यंत दुर्घटनेतील वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...