आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार : ६३ कोटी रुपयांचा आराखडा तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- २०१८-१९ या वर्षातील ६३ कोटी ६८ लाख रुपयांचा जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात शासन निधीतून ६२ कोटी ४५ लाख रुपयांची २५९८ तर लोकसहभागातून १ कोटी २३ लाख रुपयांची १२६१ कामे करण्यात येणार आहेत. अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांना आराखडा सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ११८ गावांची निवड करण्यात आली आहे. 


आराखड्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंगची ६२४, माती नाला बांधची ७, दगडी बांध २, सलग समपातळी चर २०, शेततळे २३५, साखळी सिमेंट बंधारा १३०, सिमेंट बंधारा दुरुस्ती १२, अपूर्ण पाझर तलाव पूर्ण करणे २, पाझर तलाव दुरुस्ती ६७, केटी वेअर दुरुस्ती १८, रिचार्ज शाफ्ट ४४७, गाव तलाव दुरुस्ती १७, माती नाला बांध २३, गाळ काढणे २१८, ठिबक सिंचन ५७७, चिबड चर १७२ अशी एकूण २५९८ कामे सुचविण्यात आली आहेत. लोकसहभागातून वनराई बंधारे ६०, विहीर पुनर्भरण १२०१ या कामांचा समावेश आहे. 


११८ गावांचा समावेश 
योजनेचे हे चौथे वर्ष आहे. मागील तीन वर्षात ८१० गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात गावेच शिल्लक नसल्याने ११८ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येणार आहे. शासनाने कॅनाल परिसरात असलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना न राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंढरपूर, माळशिरस व माढा तालुक्यातील गावे वगळण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...