आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दिव्य मराठी\'चे मुख्य उपसंपादक सिद्धाराम पाटील यांची सोलापूर विद्यापीठ सिनेटवर नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धाराम पाटील - Divya Marathi
सिद्धाराम पाटील

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटवर 'दिव्य मराठी'चे मुख्य उपसंपादक सिद्धाराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर विद्यापीठ सिनेट सभागृहात दहा सदस्य राज्यपाल नियुक्त असतात. यातील आठ सदस्यांची नावे राज्यपाल भवनातून घोषित करण्यात आली. त्यात 'दिव्य मराठी'चे मुख्य उपसंपादक सिद्धाराम पाटील यांचा समावेश आहे. 

 

सोलापूर विद्यापीठाकडे राज्यपाल नियुक्त आठ सदस्यांच्या नावांची यादी प्राप्त झाली आहे. उर्वरित दोन नावे राज्यपाल भवनाकडूनच अंतिम केली जातील. नवनियुक्त सिनेट सदस्यांना विद्यापीठाकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली. 

 

कोण आहेत सिद्धाराम पाटील?

 

- गेल्या 15 वर्षांपासून मराठी पत्रकारितेत कार्यरत, सध्या दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीत मुख्य उपसंपादक म्हणून काम करत आहेत.
- तसेच 2007 पासून विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मासिक 'विवेक विचार'चे संपादक म्हणून कार्यरत आहेत.
- सोलापूर तरुण भारत मधून ऑक्टोबर 2003 मध्ये पत्रकारितेला सुरुवात. 2003 ते मे 2011 दरम्यान तरुण भारतच्या आसमंत या रविवार पुरवणीचे संपादक म्हणून काम पाहिले.
- स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व्यक्तिमत्त्व विकास, योग, धर्मांतरणाची समस्या, दहशतवाद आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
- सोलापुरात नोव्हेंबर 2013 मध्ये झालेल्या विवेकानंद साहित्य संमेलनचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, सिनेटवर निवड झालेल्यांची उर्वरित मान्यवरांबाबत....

बातम्या आणखी आहेत...