आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन कलुबर्मेखून प्रकरण: मंगळवेढ्याच्या नगरसेवकांसह तिघांना न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- फेसबुकवरील प्रतिक्रियेच्या कारणावरून सचिन कलुबर्मे यांचा खून केल्या प्रकरणातील संशयित दोन नगरसेकांसह तिघांना येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश के. के. माने यांनी न्यायालयीन कोठडी दिली. 


नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी (वय ३१), प्रशांत सुभाष यादव (वय २६), शिवराज बाळासाहेब ननवरे (वय २२, रा. क्रांती चौक, पंढरपूर)   अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. 


२५ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील मुरलीधर चौकातून एका लग्नाची वरात जात होती. या वेळी गणेश पान शॉपजवळ सचिन ज्ञानेश्वर कलुबर्मे यांच्या गळ्यावर, हातावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. तर प्रदीप हरी पडवळे याचा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. घटनेनंतर तीन संशयितांना पकडण्यात आले. दोन नगरसेवकांसह तिघे संशयित महिनाभर गायब होते. 

बातम्या आणखी आहेत...