आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी नातेवाईंकानी झिडकारले, बॅंकांनी कर्ज नाकारले, आता रेल्वेत चणे विकून करतात लाखोंची कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही कठीण परिस्थितीवरही मात करु शकता आणि लोकांमध्ये आदर्श निर्माण करु शकता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन इतरांसाठी प्रेरणा निर्माण करणारी माणसे आपल्या अवतीभवतीच आढळतात. अशांपैकीच एक आहेत दाळवाले शिंदे मामा. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीत राहणारे पांडुरंग शिंदे मामांना एके काळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची पण ते आत्ता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर रेल्वेत चणे फुटाणे विकून वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत. शिंदे मामांनी कामाच्या शोधात भटकणा-या तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आज आम्ही त्यांच्या या यशोगाथेबद्दल सांगणार आहोत.  


कुर्डुवाडी शहरात राहणारे पांडुरंग शिंदे दररोज हुतात्मा एक्सप्रेस व इंद्रायणी या एक्सप्रेसमध्ये गेल्या दहा वर्षांपासून डाळे ( भाजलेले चणे) विकत असुन रेल्वेत भेटलेल्या तरुणांना नोकरी न करता व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला ते देत आहेत. पांडुरंग शिंदे यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात 2008 साली पत्नी शालन हिचे दागिने विकुन केली होती. आज हे डाळेवाले शिंदे मामा पाऊण कोटींचे मालक झाले असून महिन्याला एक लाखांची कमाई करत आहेत.

 

पत्नीचे मंगळसूत्र विकून व्यवसायाला सुरुवात

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबाला उभारी देण्यासाठी पांडुरंग शिंदे यांनी बॅकेकडे व खाजगी सावकारांपुढे पैश्यासाठी हात पसरले मात्र शिंदे यांच्याकडे गहाण ठेवण्यासाठी राहत्या पत्र्याच्या शेडशिवाय काहीच नव्हते. शेती नव्हती. यामुळै बॅंकानी त्यांना कर्ज  नाकारले. यामुळे 
हताश न होता शिंदे याच्या पत्नी शालन यांनी त्यांच्या गळ्यातली दागिने विकून तीन हजार रुपये आणले. या पैशांतून त्यांनी बसस्थानक रेल्वे स्थानकावर फिरुन चक्की, खारेमुरे,शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. यातून थोडा फार  आधार मिळू लागला. रेल्वेत फिरुन अधिक व्यवसाय होतो हे ध्यानी आल्यावर पांडुरंग शिंदे यानी 2008 साली डाळे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. यातुन चांगला फायदा मिळू लागल्याने शिंदे यांनी हुतात्मा एक्सप्रेस व इंद्रायणी या दोन रेल्वेत दररोज सातत्याने  डाळे विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. 

 

असा असतो दिनक्रम
दररोज पहाटे चारला  उठणे, डाळे,लाडू, शेंगदाण्याचे पत्नी समवेत पॅकिंग करणे आणि साडे सात वाजता हुतात्मा एक्सप्रेस ने सुरूवात करण,  साडे नऊ वाजता दौंड रेल्वे स्थानक आले की उतरणे, स्थानकावर आराम करुन ते साडे दहा वाजता इंद्रायणी गाडीने माघारी कुर्डूवाडीच्या दिशेने  निघतात. या दोन गाड्यांत दोन- दोन तास असे  तास व्यवसाय करतात. मुग दाळ, चना दाळ, शेंगा लाडू,बटाटा खिस ,नायलाॅन शाबुदाणा तिखट शेंगा, खारी शेंगा,बेसन शेंगा, भडंग आदि प्रकारचे पॅंकिग पदार्थ ते दररोज चार तासात  दहा हजारांचा माल विकतात.याना यातुन  यातून दरदिवशी चार हजारांची कमाई होते. ते महिन्याकाठी एक लाख रुपये निव्वळ कमाई करताहेत. मार्केटिंग चे कौशल्य आत्मसात केलेल्या पाडुरंग शिंदे हे आपल्या खुमासदार शैलीत बोलून मालविक्रीत करत  व्यवसायातुन समृध्दी मिळवित आजच्या घडीला दहा वर्षानंतर ते पाऊण कोटीचे मालक झाले आहेत.


मुलामध्ये निर्माण केली व्यवसायाची आवड 
शिंदे यांनी या व्यवसायाच्या जोरदावर पिंपरी चिंचवड येथे फ्लॅट विकत घेतला असून, दो टेम्पो, तीन दुचाकी आणि अन्य बचत इत्यादी मिळून पाऊन कोटींची संपत्ती कमविली आहे. एवढेच नाही तर मुलाचे आणि मुलीचेही लग्न त्यांनी याच व्यवसायाच्या जोरावर पार पाडले. मुलाला  पिंपरी चिंचवड मध्ये घेतलेल्या फ्लॅट मध्ये शेंगा चटणीचा व्यवसाय सुरु करुन देत मुलगा आणि सुनेला या व्यवसायाची आवड निर्माण करुन दिली आहे. दहा वर्षांपासुन दररोज  हुतात्मा एक्सप्रेस मधुन  जाणारे हजारो प्रवाशी या शिंदे मामा ना डाळे वाले मामा म्हणूनच ओळखत आहेत. आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता छोटा का होईना व्यवसाय सुरु केला अणि त्यात सातत्य राखले तर तोही लखोपती होण्यास वेळ लागत नाही हेच शिंदे मामांनी दाखवून दिले आहे. 

 

पुढील स्लाई़वर पहा शिंदे मामा यांचे निवडक फोटो आणि व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...