आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग, जमावाने शिक्षकाला केली मारहाण, आरोपी अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक शिक्षकाने महिला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतप्त जमावाने शाळेत घुसून आरोपी शिक्षकाला मारहाण केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक केली आहे. शहरातील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार शुक्रवारी घडला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्रावर मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. भाग दोनची परीक्षा सुरु होती. यावेळी पर्यवेक्षक अकबर नदाफ ड्युटीवर होता. पेपर लिहित असलेल्या विवाहित विद्यार्थिनीसोबत त्याने उत्तरपत्रिकेवर सही करतेवेळी लगट केली. पहिल्यांदा विद्यार्थिनीने त्यांना विनंती करुन तेथून जाण्यास सांगितले. मात्र जाणूनबुजून पर्यवेक्षकाने असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. परीक्षा संपल्यानंतर पीडित महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाईंकाना सांगितला. संतप्त नातेवाईक काही वेळातच परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि त्यांनी नदाफ याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिली. महिलेच्या तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...