आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीच्या मराठी चित्रपटास थंंडा प्रतिसाद; प्रेक्षक म्हणतात, प्रत्येकाने पाहावा असा चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- संसाराला वाहून घेतलेली एक परिपूर्ण स्त्री ते स्वतःतून बाहेर पडत एक वेगळे विश्व अनुभवायची मिळालेली संधी असा प्रवास करणारा माधुरीचा बकेट लिस्ट हा मराठी चित्रपट प्रत्येक स्त्रीने पाहावा असाच आहे. मात्र कधीकाळी सुपर डुपर अभिनेत्री असलेल्या माधुरी दीक्षितच्या या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाला थंडा   प्रतिसाद आहे. 


धर्म प्रॉड्क्शनच्या करण जोहर यांनी मराठीत एक वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केले आहे. एक सामान्य कुटुंबापासून सुरू होणारा हा प्रवास वेगळ्या विश्वात नेणार आहे. कधी हसवणारा, कधी रडवणारा तर कधी विचार करायला लावणारा आणि कधीकधी केवळ मजा मस्ती करायला लावणारा हा चित्रपट प्रचंड ताकदीचा तयार झाला आहे. 


स्त्रीच्या इच्छेचा प्रवास 
 कथानक मांडणी आणि माधुरी दीक्षित यांचा अभिनय अतिशय सुंदर आहे. एका स्त्रीची सुप्त इच्छा नंतरच्या काळात कशा पद्धतीने पूर्ण होते हा एक वेगळा प्रवास या चित्रपट पाहायला मिळतो.
- नारायण शिंदे, खासगी नोकरदार 


उत्कृष्ट चित्रपट 
प्रत्येक स्त्रीने पाहावा असाच हा चित्रपट आहे स्त्री आपला संसार म्हणजेच आपले विश्व या सुखात जो आनंद मानतो जगात कुठे नाही. मात्र त्या पलीकडेही काही तरी विश्व असते जे केवळ स्त्रियांचे असते ते अनुभवण्याचे नक्कीच बकेट लिस्ट च्या निमित्ताने मिळू शकेल. 
 - सुवर्णा गायकवाड, गृहिणी 


यांच्यामुळे नटलाय चित्रपट 
तेजस देऊस्कर यांनी उत्तमपणे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुमित राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, शालवा किंजवडेकर, मिलिंद फाटक आदींनी उत्तम असा अभिनय केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...