आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: अखिल भारतीय लिंगायत मोर्चा, समर्थक आणि विरोधक आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवारी (दि.३ जून) सोलापूर येथे लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान लिंगायत धर्म मान्यतेच्या मागणीला तीव्र विरोध असून लिंगायत धर्म मोर्चामध्ये वीरशैव लिंगायत समाजाने सहभागी होऊ नये, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.

 

मोर्चात सहभागी होऊ नये : प्रा. धोंडे
वीरशैव आणि लिंगायत हे समाज अर्थी शब्द आहेत. मूळ प्राचीन शब्द हा वीरशैव असून बोलीभाषेतील प्रचलित शब्द हा लिंगायत असा आहे. त्यामुळे वीरशैव आणि लिंगायत हे वेगवेगळे होऊच शकत नाहीत. परंतु सध्या कर्नाटकातील काही धर्मगुरू राज्यकर्त्यांच्या हातचे खेळणे बनून शब्दछल व बुद्धीभेद करत वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे असल्याचे सांगत लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळविण्याच्या नावाखाली धर्मामध्ये फूट पाडण्याचे षड््यंत्र केले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...