आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज चोरीचे गुन्हे दाखल करणे झाले आता सोपे, महावितरणचे पोलिस ठाणे बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी महावितरणचे असलेले स्वतंत्र विशेष पोलिस ठाणे आता बंद करण्यात आले असून आता वीज चोरी संदर्भातील गुन्हे सोलापूर जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात करता येतील. राज्याच्या गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता वीज चोरीचे गुन्हे दाखल करणे सोपे झाले आहे. 

 

सोलापूर जिल्ह्यातील वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी पूर्वी लातूरला जावे लागत होते. लातूर येथे महावितरणचे विशेष पोलिस ठाणे होते. या नव्या व्यवस्थेमुळे लांबचा प्रवास वाचणार आहे. नव्या निर्णयामुळे सोलापूर शहर पोलिसांच्या हद्दीतील वीज चोरीचे गुन्हे सदर बझार पोलिस ठाण्यात नोंदवले जाणार आहेत. 
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अकलूज, पंढरपूर व मंगळवेढा या पोलिस उपविभागांतील वीजचोरीचे गुन्हे माळशिरस पोलिस ठाण्यात, बार्शी व करमाळा पोलिस उपविभागांतील वीजचोरीचे गुन्हे बार्शी पोलिस ठाण्यात, तर सोलापूर व अक्कलकोट पोलिस उपविभागांतील वीजचोरीचे गुन्हे सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे गुन्हे नोंदवणे सोपे होणार आहे. 
३ हजार जणांची नावे एकापेक्षा अधिक वेळा 

बातम्या आणखी आहेत...