आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन वीजबिलांसाठी उपक्रम, महावितरणकडून पोस्टर प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "ऑनलाईन'द्वारे होणारा वीजबिल भरणा आता महावितरणाने निःशुल्क केला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील वीजग्राहकांनी "ऑनलाईन' द्वारे जास्तीत जास्त वीजबिलांचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून जागर सुरू करण्यात आला आहे. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याबाबतचे फायदे वीजग्राहकांना पटवून देण्यात येणार आहेत. वीज बिल भरणा केंद्र येथे पाेस्टर लावणे, सोशल मीडियावर क्लिप प्रसिध्द करणे आदी विविध उपक्रमाद्वारे वीज ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे.

 

वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी व त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाइल अॅपच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या घरगुती किंवा इतर वीजबिलांचा भरणा फक्त "ऑनलाइन'द्वारे भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधित कार्यालय प्रमुखांकडून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहे. याशिवाय केंद्रात रांगेत असलेल्या वीजग्राहकांशी संवाद साधून मोबाइल अॅप, वेबसाइटद्वारे ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या प्रक्रियेची व त्याच्या फायद्याची माहिती देण्यात येणार आहे.


ऑनलाइन भरणा आता निःशुल्क
क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी "ऑनलाइन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा "ऑनलाइन' भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून "ऑनलाइन'द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे

 

बातम्या आणखी आहेत...