आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाढा(सोलापुर) - तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण 'त्यांना' पाहणारे म्हणतात आम्हाला खरोखरच राजेश खन्ना भेटले. जगात आपल्या सारखी हुबेहुब दिसणारी सात माणसे असतात ही म्हण सर्वश्रृत आहे. याचीच प्रचिती माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील रहिवासी असलेले कासीम हबीब सय्यद यांच्याकडे बघितल्यावर येते. कारण कासीम सय्यद हुबेहुब हिंदी अभिनेता कै.राजेश खन्ना यांच्यासारखे दिसतात. विशेष म्हणजे हा अवलिया वयाच्या 14व्या वर्षांपासुन राजेश खन्नांचा चाहता आहे.
घरची परिस्थिती हालाखीची. तरीही राजेश खन्नाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कासीम सय्यद यांनी उधारीवर राजेश खन्नासारखे शर्ट्स शिऊन घेतले आहेत. एवढेच नव्हे तर उधारीवर फोटोग्राफरकडून खन्ना याच्यां पोजमध्ये ते फोटोही काढत आले आहे. शरीर यष्टी व चेहरा हुबेहुब राजेश खन्नासारखे असल्याने त्यांच्या कुटूबिंयानी व मित्रमंडळीनीही कासीम यांचे टोपणनाव राजेश ठेवले आहे.
एखाद्या कलाकारावर प्रेम असावे तर किती असा प्रश्न तुम्हाला कासिम यांच्याकडे पाहून पडू शकतो. कारण कासिम यांना सरकारी नोकरीची ऑफर आली होती. मात्र ती स्वीकारल्यास राजेश खन्नांच्या स्टाईलमध्ये राहता येणार नाही म्हणून त्यांनी चक्क नोकरीला नकार दिला. राजेश खन्नांचे 18 जुलै 2012रोजी मुंबईमध्ये निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूपश्चातही कासिम आपल्या लाडक्या अभिनेत्यावर जिवापाड प्रेम करत आहे.
राजेश खन्नांसारखी चेहरापट्टी, मानेचा विशिष्ट अँगलमध्ये कल, नाकावर चष्मा, केसांची स्टाईल, राहणीमान, पट्टी काॅलर असणारा शर्ट असा हुबेहुब राजेश खन्नांसारखा पेहराव करुन कासिम सय्यद हे वावरत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर राजेश खन्ना आजही हयातीत असल्याचा अनेकांना भास होतो. कासिम सय्यद हे एखाद्या नविन गावात गेले तर लोक वळुन पाहतात खरोखरचं राजेश खन्ना आलेत की काय. यहाॅ वहाॅ सारे,जहाॅ में तेरा राज हैं, ये जो मोहब्बत हैं, ये उनका हैं काम, मेरे सपनो की रानी कब आये गी तु... अशा राजेश खन्नाच्याच चित्रपटातील गाणी ते मधुर आवाजात हावभाव करीत आजही गातात.
अभिनेत्याच्या मृत्युपश्चात ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करणा-या या कुर्डूवाडीच्या अवलियाने एकप्रकारे चाहता म्हणजे काय असतो, हेच दाखवून दिले आहे. आजच्या 4जी स्पीड जमान्यात आताच्या पीढीतल्या अभिनेत्याला असा चाहता मिळणे जवळपास दुरापस्त आहे. स्टाईल करुन लोक राजेश खन्ना म्हणत असले तरी पोट भरत नाही हे लक्षात आल्यावर कासिम हे सध्या कुर्डूवाडी मध्ये अंतर व गाॅगल विक्रीचा व्यवसाय करु लागले आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, या अवलियाचे किस्से...उसने पैसे घेऊन पाहायचे पहिला शो...सोबत टेलरलाही घेऊन जायचे...नंतर शिवायचे हुबेहूब ड्रेस...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.