आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'म्होरक्याचे\' चे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या, गृहमंत्र्यांना पत्र लिहून संपवले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट म्होरक्याचे निर्माते कल्याण पडाल (वय 38) यांनी सोलापुरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. या उपचारासाठी सावकाराकडून घेतलेले पैसे परत न करु शकल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार पडाल यांचा कर्करोग शेवटच्या स्टेजला होता. उपचारासाठी त्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे परत न केल्याने दोन दिवसांपूर्वी सावकाराने त्यांना घरातून बाहेर नेले व डांबून मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनी सोलापूर पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आत्महत्या केली आहे. यामुळे शहरात आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

 

मुलाचा आजार एेकून वडिलांचेही महिन्यापूर्वी निधन 
कल्याण यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. व्यंकटेश पडाल म्हणाले, कल्याण बांधकाम विकसक होता. त्याने जमवलेले काही पैसे 'म्होरक्या' मध्ये गुंतवले होते. दरम्यान त्याला यकृताचा कर्करोग झाल्याचे कळताच वडिलांनी महिन्यापूर्वीच प्राण सोडला. उपचारासाठी त्याने खासगी सावकारांकडून काही रकमा घेतल्या होत्या. त्यांचा तगादाही सुरु होता. एके दिवशी त्याची औषधाची वेळ झाली होती त्यावेळी काही सावकार घरी आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले. त्याचा मोबाईलही बंद होता. तो काही तासांनी घरी परतला तेव्हा तो खूप तणावात होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या लोकांविषयी माहिती देणे टाळले. यानंतर लगेच दोन दिवसांनी आत्महत्या केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...