आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस कर्जे, जमिनी लाटणारी आैलाद कोणाची? आमदार प्रणितींवरील शेरेबाजीचा केला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुळे सोलापुरातील २० एकर आरक्षित जमीन बळकावणारी, शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्जे लाटणारी, जुनी मिल जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी मुलाच्या नावाने भूखंड मिळवणारी अौलाद कुणाची? असा संतप्त सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना अपशब्द वापरल्याचा निषेध करून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गैरकारभाराची जंत्री सादर केली.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राजकारण पेटले आहे. निंबर्गी येथील एका कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि लोकमंगल संपवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक व्हावे, असे आवाहन केले होते, त्‍यांना उत्‍तर देताना मंत्री देशमुखांनी, 'लोकमंगल संपवणारी हीच का औलाद?' असा प्रश्‍न केला होता. औलाद हा अपशब्‍द आहे. त्‍याने एका महिला आमदाराची अवहेलना झाली. त्‍याचा निषेध कतो म्हणून मंगळवारी काँग्रेस नेते एक झाले. मंत्र्यांच्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्‍यानंतर पत्रकार परिषद घेऊन देशमुखांवर थेट हल्‍ला चढवला. त्‍यात माजी आमदार दिलीप माने पुढे होते.


या प्रश्नांची उत्तरे द्या, काँग्रेसचे मंत्री देशमुख यांना आव्हान
- होटगी रस्त्यावर मंत्र्यांनी बंगला बांधला. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेली जागा कशी बळकावली?
- जुळे सोलापुरात २० एकरवर स्टेडियमचे आरक्षण होते. ती दडपशाहीने घशात घातली. मंत्रिपदाचा हा गैरवापर नाही?
- जुनी मिल जागेवरचे आरक्षण उठवण्यासाठी मुलाच्या नावाने भूखंड घेतला. त्याचे दस्त आमच्या हाती आहे. ते खोटे?
- नोटाबंदीनंतर लोकमंगलचा पैसा रंगेहाथ पकडला गेला. पुढे काहीच झाले नाही. का?
- लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्जे काढली. हे खोटे आहे?
- संभाजी महानाट्यासाठी व्यापाऱ्यांकडून एक कोटी वसूल केले. त्याचे काय?

 

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते एक झाले. त्यामुळे देशमुखांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यासरशी जीभही घसरत चालली आहे. यापूर्वीही शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दलही त्यांनी असेच बेताल वक्तव्य केले होते. स्वत:च्या पक्षातही त्यांच्या कासवाचे कुणाशी जमत नाही. ससा अाणि स्वस्तिकही जमवून घेत नाही. त्यामुळे महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे.
- दिलीप माने, माजी अामदार

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, काँग्रेस नेत्‍यांच्‍या आरोपावर काय म्‍हणाले भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष...

 

बातम्या आणखी आहेत...