आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- भाजी विक्रीसाठी मोटारसायकलवरुन चाललेल्या एका शेतक-याला अज्ञात ट्रकने धडक दिली पण सहकारमंत्र्यांच्या तत्परतेमुळे त्याला वेळीच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्याचे प्राण वाचले. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, होनमुर्गी गावाजवळ अपघातग्रस्त शेतकरी जखमी अवस्थेत विव्हळताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता गाडी बाजूला घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वत:ची गाडी देऊन जखमी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. फोनवर सिव्हिल मध्ये डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले.
देशमुख यांनी मंत्री असल्याची किंवा दुसरे कुणीतरी मदत करेल ही भावना मनात न आणता तत्परतेने जखमी शेतक-याची मदत केली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. हे दृश्य पाहून तेथे जमलेल्या लोकांनी त्यांचे आभार मानले. अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागल्याच्या देशभरात अनेक घटना घडल्या आहेत. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी फार कमी लोक पुढे येतात. अशातच देशमुख यांनी नवीन आदर्श घालून दिला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.