आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या त्रासामुळे आई, बहीण, भावाचा खून; सोलापुरातील तिहेरी हत्येचे गूढ उकलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ असलेल्या याच झोपडीत तिघांचा खून करण्यात आला. - Divya Marathi
तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ असलेल्या याच झोपडीत तिघांचा खून करण्यात आला.

सोलापूर- घरकाम व इच्छेविरोधात लग्न लावून देण्याच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे सख्ख्या बहिणींनी स्वत:ची आई, भाऊ आणि बहिणीची हत्या घडवल्याचे उघडकीस आले आहे. धुना रणछोड जाधव (२०), वसन रणछोड जाधव ( १९, रा. तिऱ्हे परिसर सोलापूर) अशी या आरोपी बहिणींची नावे असून त्यांना अटक झाली अाहे. या दोघींना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.


शुक्रवारी सोलापूर शहराजवळील तिऱ्हे परिसरात हतयबाई रणछोड जाधव (५०),  लाखी रणछोड जाधव (२१), मफा रणछोड जाधव (१९) यांची हत्या झाली होती आणि दोन्ही बहिणी बेपत्ता होत्या. त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण दरोड्याच्या निमित्ताने घडल्याचा संशय होता. कुटुंबप्रमुख रणछोड जाधव हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रणछोड यांना चार मुली, एक मुलगा असून एका मुलीचा विवाह झाला आहे.  मागील ८ वर्षांपासून ते कुटुंबीयांसह या भागात दूध विक्री व शेणखत विक्रीचा व्यवसाय करत आहेत. धुना व वसन या दोन मुलींनाच दररोज घरातील धुणी, भांडी, दूध काढणे, शेणखत काढणे आदी कामे करावी लागायची. कामात थोडी चूक झाली, उशीर झाला की अाई, वडील, बहीण, भाऊ शिवीगाळ करायचे. भावाने तर दोघींना मारण्यासाठी घरात अनेक काठ्या अाणून ठेवल्या होत्या. अनेकदा मारहाण करायचा. हा त्रास तीन वर्षांपासून सुरू होता. पसंत नसलेल्या मुलाशी लग्न करून घे, म्हणून त्रास द्यायचे. त्यातूनच दोघींनी ही हत्या केली.

 

घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हाेते?   
५ एप्रिलला दोन बहिणी व भावांत भांडणे झाली.  त्याच दिवशी दुपारी दोघी बहिणींनी येत्या २४ तासांत तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकी दिली. अादल्या दिवशीच वडील गावी गेले होते. रात्रभर त्या संधीची वाट पाहत होत्या. पहाटे साडेपाचला संधी मिळाली. लोखंडी पहार (टाॅमी) घेऊन अगोदर भावाला, नंतर बहिणीला  आणि आईला दोघींनी मिळून संपवले.

 

हे ही वाचा...

सहप्रवाशाच्या मोबाइलवरून वडिलांना केला फोन, दोघी अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात...

बातम्या आणखी आहेत...